मुलीच्या लग्नासाठी मदतीचा हात – ईर्शाद जागीरदार यांच्याकडून शकील अहमद यांना आर्थिक सहाय्य..

आबिद शेख/ अमळनेर
धुळे शहरातील रहिवासी शकील अहमद यांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती मिळताच ईर्शाद जागीरदार यांनी तत्परतेने पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या डीएलएल कार्यालयात शकील अहमद यांना बोलावून प्रत्यक्ष मदतीचा चेक सुपूर्द केला.
सामाजिक कार्याच्या माध्यमातून नेहमीच लोकांच्या मदतीला धावून जाणारे ईर्शाद जागीरदार यांचा हा उपक्रम शहरात कौतुकास्पद ठरत आहे.
