कुख्यात गुन्हेगार समीर हनीफ काकर यास एमपीडीए कारवाईत येरवडा कारागृहात स्थानबद्ध.

0
New-Doc-09-27-2025-11.11-1.jpg

24 प्राईम न्यूज 27 Sep 2025

जळगाव :एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या नोंदवहीत असलेला कुख्यात सराईत गुन्हेगार समीर हनिफ काकर (वय २२, रा. विस्मिल्ला चौक, तांबापुरा, जळगाव) यास अखेर एमपीडीए कारवाईत ताब्यात घेऊन पुणे ये

थील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

समीर काकर याच्यावर मारहाण, दरोडा, जखमी करणे, घरफोडी, खुनाचा प्रयत्न यांसह शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध मिळून तब्बल १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तांबापुरा व मेहरुण परिसरात तो व त्याच्या टोळीची दहशत होती. यापूर्वी त्यास १ वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते. मात्र हद्दपारीनंतरही त्याने गुन्हेगारी सुरुच ठेवल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याने त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविला होता. त्यानुसार मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ४ सप्टेंबर २०२५ रोजी काकरला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश जारी केला.

दरम्यान, आदेश मिळाल्यानंतर समीर काकर हा फरार झाला होता. मात्र २४ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकातील पो.उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पो.ना. प्रदीप चौधरी, पो.काँ. विशाल कोळी, गणेश ठाकरे व योगेश घुगे यांच्या पथकाला पुण्यात रवाना केले. त्यानंतर पथकाने २५ सप्टेंबर रोजी पुण्यात समीर काकर याला अटक करून येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed