अमळनेर नगरपरिषद व महसूल विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात.

0
New-Doc-09-26-2025-22.12.jpg

आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर जनतेच्या सेवेसाठी व राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी राज्य शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “सेवा पंधरवडा” राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महसूल विभाग व अमळनेर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज इंदिरा भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराला मा. आमदार अनिल भाईदास पाटील, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी तुषार नेरकर, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, नायब तहसीलदार प्रशांत धमके, अजय कुलकर्णी, उपाधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय गावित मॅडम, उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण, नगर अभियंता सुनील पाटील, अजित लांडे, नगरपरिषद लेखापाल सुदर्शन राज शामनानी, कृणाल कोष्टी, विद्युत अभियंता कुणाल महाले, अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी, आस्थापना प्रमुख विनोद पाटील, कार निरीक्षक रोहित रामोळे, आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, संतोष माणिक यांसह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला 500 ते 600 नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
अमळनेर नगरपरिषदेतर्फे करण्यात आलेली कामे
१. दीनदयाळ अंत्योदय योजना (NULM विभाग)
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ११ महिला बचत गटांना व्यवसायासाठी ₹७३.६० लाख कर्जवाटप.
PM स्वनिधी योजना अंतर्गत १७ लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध.
विश्वकर्मा योजना व बचत गट यासंबंधी नागरिकांना मार्गदर्शन.
२. विद्युत विभाग
PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना अंतर्गत नागरिकांना सौरऊर्जेच्या माध्यमातून स्वच्छ, पर्यावरणपूरक व मोफत वीज निर्मितीचे फायदे समजावून सांगण्यात आले.
घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून वीज बचत, वीज बिलात कपात, तसेच अतिरिक्त वीज निर्मिती केल्यास वितरण कंपन्यांकडे साठवणूक करून भविष्यात वापर याबाबत मार्गदर्शन.
नागरिकांना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे व शासन अनुदान याची सविस्तर माहिती देण्यात आली.
या उपक्रमामुळे ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि स्वावलंबी ऊर्जा निर्मिती या तिहेरी उद्दिष्टांना गती मिळणार असल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले.
३. बांधकाम विभाग
प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत घरकुल वाटप व परवानगीचे वितरण.
बांधकाम परवानगी वाटप – ७ लाभार्थी (प्रातिनिधिक स्वरूपात).
घरकुल चावी वाटप – ८ लाभार्थी (प्रातिनिधिक स्वरूपात).
या शिबिरामुळे नागरिकांना शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची प्रत्यक्ष माहिती मिळाली. तसेच नागरिकांचे प्रश्‍न त्वरित सोडविण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले असे नागरिकांनी सांगितले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 116800

22 Ct सोने 91.60% : ₹. 107400

18 Ct सोने 75.00% : ₹. 88700

शुद्ध चांदी 999%:₹. 1420/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed