अमळनेरातून दोन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतूस जप्त..

0
New-Doc-09-26-2025-21.52.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर एलसीबी व स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील अनिल मोहन चंडाले याला मध्यरात्री पकडले. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि चार काडतुसे असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यावल येथे युवराज उर्फ युवा राजू भास्कर याच्याकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल व दोन काडतुसे हस्तगत केली होती. चौकशीत भूषण सपकाळे (भुसावळ) व समाधान निकम (पाचोरा) यांनी उमर्टी येथून शस्त्रे आणून विक्री केल्याची माहिती मिळाली. त्यापैकी दोन पिस्तुल व चार काडतुसे अनिल चंडाले याने खरेदी केली असल्याचे उघड झाले.

त्यानंतर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद काकळीज, संतोष नागरे, नितीन मनोरे, तसेच एलसीबीचे हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयाजवळ सापळा रचून चंडाले याला अटक केली.

या प्रकरणी अनिल चंडाले व युवराज भास्कर यांच्याविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करत आहेत.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 116800

22 Ct सोने 91.60% : ₹. 107400

18 Ct सोने 75.00% : ₹. 88700

शुद्ध चांदी 999%:₹. 1420/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed