अमळनेरात सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत स्व.आबासो अनिल अंबर माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : सामाजिक वनीकरण विभागातर्फे सेवा पंधरवड्यानिमित्त तालुक्यातील मंगरूळ येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
अमळनेर सामाजिक वनीकरण विभागाला यंदा ५ हजार ५०० झाडांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आतापर्यंत १२०० झाडे लावण्यात आली आहेत. मंगरूळ येथे मुख्याध्यापक प्रकाश पाटील तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली.
या उपक्रमावेळी वनाधिकारी सुनीता धनगर, वनपाल वैशाली साळी, वनरक्षक स्मिता शिंदे, वनरक्षक दिनेश देवरे, तसेच भटू पाटील, प्रभुदास पाटील, अशोक सूर्यवंशी, संजय पाटील, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण आणि सीमा पाटील उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 117000
22 Ct सोने 91.60% : ₹. 107600
18 Ct सोने 75.00% : ₹. 88900
शुद्ध चांदी 999%:₹. 1400/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
