३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर

0
New-Doc-09-25-2025-07.21.jpg

24 प्राईम न्यूज 25 Sep 2025


मुंबई : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र तर्फे ३२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. ०६ मे २०२५ व १६ सप्टेंबर २०२५ च्या निर्णयानुसार ग्रामविकास विभागाने अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध केली आहे. यानंतर निवडणुकीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी मतदार यादी तयार करण्याची आवश्यकता होती.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार —
१ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी हाच आधार मानून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतदार यादी तयार केली जाणार आहे.
नवीन वेबसाईट https://mahasecvoterlist.in वर जिल्हाधिकारी व संबंधित तहसिलदारांनी मतदार यादीचे विभागनिहाय विभाजन करून कंट्रोल चार्ट अपलोड करायचा आहे.
ही कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर राहील.
कार्यक्रमाचा थोडक्यात तपशील :
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : ०८ ऑक्टोबर २०२५
हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी : ०८ ते १४ ऑक्टोबर २०२५
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : २० ऑक्टोबर २०२५
मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध : २७ ऑक्टोबर २०२५
राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की विधानसभा मतदार यादीतील मतदारांची संख्या व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तयार होणाऱ्या मतदार यादीतील मतदारांची संख्या समान राहील, याची खात्री जिल्हाधिकाऱ्यांनी करून घ्यावी.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 117500

22 Ct सोने 91.60% : ₹. 108000

18 Ct सोने 75.00% : ₹. 89300

शुद्ध चांदी 999%:₹. 1390/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed