अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील बेकायदेशीर पदभरतीविरोधात धरणे आंदोलन…

0
New-Doc-09-25-2025-07.04.jpg


आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिनांक १९ मे २०२५ रोजी राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील पदभरतीस स्थगिती दिलेली असतानाही अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व सभापती यांनी शासन आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे पदभरती प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप होत आहे.

जिल्हा उपनिबंधकांनी १ ऑगस्ट २०२५ रोजीच पदभरतीस स्थगिती दिलेली असतानाही समितीकडून १० ऑगस्ट २०२५ रोजी नियमबाह्य जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामार्फत त्रयस्थ एजन्सीच्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांकडून परीक्षा शुल्काच्या नावाखाली लाखो रुपयांची वसुली केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

या फसवणुकीविरोधात सुज्ञ व अभ्यासू अर्जदारांनी छत्रपती शिवराय द्वितीय राज्याभिषेक दिनी, म्हणजेच २४ सप्टेंबर २०२५ रोजी, अमळनेर उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी श्री निंबा धुडकू पाटील (रा. वाघोदे) व श्री स्वप्रिल अशोक जाधव (रा. सोनखेडी) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी परीक्षा शुल्काची रक्कम तत्काळ परत मिळावी आणि नियमबाह्य पदभरतीची जबाबदारी असलेल्या सचिव व सभापती यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.

आंदोलनापूर्वी आंदोलकांनी जिल्हा उपनिबंधकांची भेट घेतली असता, पदभरतीची कार्यपद्धती नियमबाह्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र शासन स्तरावर ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 117500

22 Ct सोने 91.60% : ₹. 108000

18 Ct सोने 75.00% : ₹. 89300

शुद्ध चांदी 999%:₹. 1390/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed