अमळनेरमध्ये “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” : नागरिकांना थेट दिलासा देण्यासाठी उपक्रम
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व नगरविकास विभागामार्फत “सेवा पंधरवडा” अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” आयोजित करण्यात आले आहे हे शिबीर शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता, इंदिरा भवन, अमळनेर येथे पार पडणार आहे.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवड्याचा उद्देश नागरिकांच्या दारापर्यंत शासनाच्या सेवा पोहोचवणे आणि त्यांना थेट दिलासा देणे हा आहे या शिबिरात नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 117500
22 Ct सोने 91.60% : ₹. 108000
18 Ct सोने 75.00% : ₹. 89300
शुद्ध चांदी 999%:₹. 1390/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
