अमळनेर — सकल धनगर समाजाचा तहसिलदारांना निवेदन; दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा — अंमलबजावणीची तातडीची मागणी..

आबिद शेख/ अमळनेर. अमळनेर येथील सकल धनगर समाज व राजे मल्हार होळकर प्रतिष्ठान तर्फे S.T. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी माननीय तहसीलदार श्री रुपेश कुमार सुराणा यांना आज (२५ सप्टेंबर २०२५) निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे जालना येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकात 17 सप्टेंबर 2025 पासून उपोषणास बसलेल्या उपोषणकर्ते दीपक बोराडे यांना धनगर समाजाने पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे आणि राज्य सरकारकडे तातडीने पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धनगर समाजाने S.T. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अनेक मीटिंग्स आणि आंदोलनांचे आयोजन केले असून बारामती येथे मोठ्या जनसमुदायासमोर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेला आश्वासनाचा शब्द पाळला गेला नाही. या पार्श्वभूमीवर दीपक बोराडे यांनी 17/09/2025 पासून उपोषण सुरू केले आहे आणि त्यांचा हा उपोषणधारणा चालू असून समाजाला अपेक्षित प्रतिसाद अजून मिळालेला नाही.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, उपोषणकर्ता दीपक बोराडे हे आपल्या मागण्यांचे निराकरण न झाल्यास व ठोस निर्णय न आल्यास धनगर समाज राज्यभरात तीव्र आंदोलन उभारणार आहे. तसेच निवेदनात तहसीलदारांकडे विनंती करण्यात आली आहे की, दोन दिवसांच्या आत धनगर जमातीच्या घटनेकडे लक्ष देऊन दत्त S.T. आरक्षणाची अंमलबजावणी करून उपोषणकर्त्यांचे आंदोलन तात्काळ सोडवावे बन्सीलाल भागवत, एस.सी. तेले सर, प्रदीप कंखरे, रमेशदेव शिरसाठ, आनंदा हडप सर, एबी धनगर सर, दिलीप खांडेकर, तुषार इदे, संजय धनगर मांडळ, रमेश धनगर, दशरथ युवराज लांडगे, विजय हिवराळे, सचिन शिरसाठ, दत्तात्रय धनगर, नामदेव ठाकरे, तुकाराम ठाकरे, परशुराम ठाकरे धानोरा.
सकंद धनगर समाजाच्या या कृतीवर समाजातील अनेक तटस्थ आणि सक्रिय नेत्यांनी चिंता व्यक्त केली असून प्रशासनकडून लवकरच सकारात्मक पाऊल उचलले जावे ही अपेक्षा करण्यात येत आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 117500
22 Ct सोने 91.60% : ₹. 108000
18 Ct सोने 75.00% : ₹. 89300
शुद्ध चांदी 999%:₹. 1390/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
