अमळनेरमध्ये लाच प्रकरण उघडकीस : दोन पोलीस कर्मचारी व पंटर एसीबीच्या जाळ्यात..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवैध गॅस रिफिलिंग सेंटर सुरू करण्यासाठी तब्बल १२ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचारी आणि एका खाजगी पंटरविरोधात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे.
या प्रकरणात तक्रारदाराकडून पान दुकानावर लाचेची रक्कम ठेवताच एसीबीच्या पथकाने तत्काळ सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. सध्या हे तिन्ही आरोपी धुळे येथे एसीबीच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.
अवैध गॅस रिफिलिंगसाठी मागितली लाच
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात अवैध गॅस रिफिलिंग केंद्रांवर बंदी असताना, अमळनेर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी कायद्याची पायमल्ली करत एका व्यक्तीकडून १२ हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकरणात एक खाजगी पंटर मध्यस्थाची भूमिका बजावत होता अमळनेर सारख्या संवेदनशील शहरात अगोदरच कायदा व सुव्यवस्था आव्हानात्मक ठरली असताना, अशा घटना पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 117500
22 Ct सोने 91.60% : ₹. 108000
18 Ct सोने 75.00% : ₹. 89300
शुद्ध चांदी 999%:₹. 1390/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
