मेहरगाव येथे पाणीपुरवठ्याची मोटर सुरू करताना शिपाई शॉक लागून गंभीर जखमी..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुका – मेहरगाव येथील ग्रामपंचायतीचा शिपाई प्रफुल्ल श्रीधर पाटील (वय ३८) पाणीपुरवठ्याची मोटर सुरू करताना शॉक लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. ही घटना १७ सप्टेंबर रोजी घडली.
जखमी पाटील यांना तातडीने अमळनेर येथील नर्मदा फाउंडेशनमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घरातील एकमेव कमावता व्यक्ती असल्याने त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती बिकट झाली आहे.
या घटनेनंतर ग्रामपंचायत कर्मचारी तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील, सचिव सुभाष पाटील, सदस्य गोपाल कोळी, प्रदीप धनगर, प्रदीप महाजन आदींनी रुग्णालयात भेट दिली. संघटनेकडून पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी विभागीय सचिव सुभाष पाटील यांनी गावातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित पगार मिळत नाही. सहा-सहा महिने पगार थकलेले असतात. तरीसुद्धा गावात पाणीपुरवठा व इतर जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांसारखे कोणतेही संरक्षण मिळत नाही. किमान आरोग्य विमा व जीवन विम्याचे कवच तरी ग्रामपंचायतीतर्फे मिळावे, अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 115500
22 Ct सोने 91.60% : ₹. 106000
18 Ct सोने 75.00% : ₹. 87800
शुद्ध चांदी 999%:₹. 1380/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
