महायुतीसोबतच अमळनेरवर प्रेम करणाऱ्यांना घेऊन नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग – आ. अनिल पाटील. माजी आमदारांच्या गटाला मोठा धक्का; अनेक माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेरच्या राजकारणात हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अमळनेरवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. येणारी निवडणूक कोणत्याही परिस्थितीत सर्वांनी मिळून जिंकायची असल्याचे प्रतिपादन त्यांनी बैठकीत केले.
आ. पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान माजी आमदारांच्या गटातील अनेक माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमदार पाटील यांची ताकद वाढवली. यामुळे माजी आमदारांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.
बैठकीत बोलताना आ. पाटील म्हणाले, “आपण भवनेने नव्हे तर उमेदवाराच्या स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवायची आहे. उमेदवाराने डबल भूमिका नकोच, तसेच प्रभागाचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे. मी स्वतः मुलाखती घेणार असून नाव लोकांमधून यायला हवे. जात-धर्म न पाहता सर्वांना सोबत घेऊनच विजय मिळवायचा आहे.”
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना ताकदीने लढण्याचे आवाहन करताना, “आपल्या अमळनेरचा माणूस हीच आपली जात-धर्म आहे. संघर्ष आपण एकत्रितपणे केला आहे. पुढील काळात विकासाचे मोठे व्हिजन आहे. प्रामाणिक काम करणाऱ्यांच्या पाठीशी मी उभा राहणार आहे,” असे स्पष्ट केले.
बैठकीत माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील, माजी उपनगराध्यक्ष मोहन सातपुते, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले.
राष्ट्रवादीत प्रवेश करून ताकद वाढवणारे माजी नगरसेवक
या बैठकीत माजी नगरसेवक सलीम शेख (टोपी), फिरोज मिस्तरी, अॅड. सुरेश सोनवणे, नितेश लोहरे, इम्रा शेख, मुकेश शिवदास बिर्हाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
या प्रवेशामुळे निवडणुकीच्या तोंडावर अमळनेरच्या राजकारणात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 115500
22 Ct सोने 91.60% : ₹. 106000
18 Ct सोने 75.00% : ₹. 87800
शुद्ध चांदी 999%:₹. 1380/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
