२६ ते २८ सप्टेंबरदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार..
24 प्राईम न्यूज 23 Sep 2025

मुंबई : राज्यात पावसाने पुन्हा एकदा सक्रिय रूप धारण करण्याची चिन्हे हवामान खात्याने वर्तवली आहेत. येत्या २४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून, त्याचा प्रभाव २८ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात जाणवणार आहे.
या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान राज्यात ढगाळ हवामान व पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असून, ३० सप्टेंबरपर्यंत पाऊस थांबण्याची शक्यता नाही, असे हवामान खात्याने सांगितले.
२२ ते २५ सप्टेंबरदरम्यान राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित असून, हा पाऊस मुख्यत्वे दुपारनंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम २६ तारखेपासून जाणवू लागेल.
२६ सप्टेंबर: विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व व दक्षिणेकडील भागांमध्ये पावसात वाढ.
२७ सप्टेंबर: विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस, तर काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता.
२८ सप्टेंबर: राज्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम.
एकूणच, राज्यात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण निर्माण होणार असून, पुढील आठवडाभर शेतकरी व नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 115500
22 Ct सोने 91.60% : ₹. 106000
18 Ct सोने 75.00% : ₹. 87800
शुद्ध चांदी 999%:₹. 1380/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
