जंगलातील प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे हाल : उदयनगर परिसरातील शेतकऱ्यांना अनुदानावर तारेचे कुंपण देण्याची मागणी..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यातील उदयनगर, जानवे, कावपिंप्री, इंद्रापिंप्री तसेच पारोळा तालुक्यातील सुमठाणे, इंधवे, पिंपळकोठा या गावांलगतच्या वनक्षेत्रामध्ये नीलगाय, हरीण, जंगली डुक्कर व मोर यांसारख्या प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. या प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.
शेतकऱ्यांना आपली पिके वाचवण्यासाठी दिवस-रात्र शेतात पहारा द्यावा लागतो, अन्यथा पूर्ण पीक हानी होते. या सततच्या उपद्रवामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करणेच बंद केले आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती, त्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव, त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले जात आहेत. खरीप हंगामाची ही अवस्था असताना रब्बी हंगाम अधिक कठीण असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर राजेश वाघ (सामाजिक कार्यकर्ता, उदयनगर) व प्रकाश वाघ (लोकनियुक्त सरपंच, उदयनगर) यांनी माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील यांच्याकडे निवेदन देऊन शासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांची मागणी :
जंगल परिसरात कायमस्वरूपी पाणवठ्यात पाण्याची व्यवस्था करावी.
संपूर्ण जंगलाभोवती तारेचे कुंपण उभारावे.
तसेच जंगलालगतच्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदानावर तारेचे कुंपण द्यावे.
यामुळे पिकांचे संरक्षण होऊन शेतकऱ्यांच्या हातात काहीतरी उत्पन्न येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 115500
22 Ct सोने 91.60% : ₹. 106000
18 Ct सोने 75.00% : ₹. 87800
शुद्ध चांदी 999%:₹. 1380/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
