गरबा कार्यक्रमांवरील बंदीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम तरुणांना एकता संघटनेचे आवाहन.
24 प्राईम न्यूज 22 Sep 2025

जळगाव :अलीकडेच मंत्री नितेश राणे, मंत्री बावनकुळे आणि प्रवीण तोगडिया यांनी विश्व हिंदू परिषदेसह केलेल्या घोषणेत गरबा व इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्यात येईल आणि मुस्लिमांना प्रवेश नाकारण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले. या विधानामुळे मुस्लिम समाजात असंतोष पसरला असून त्याविरोधात एकता संघटनेने मुस्लिम तरुण-तरुणींना आवाहन केले आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की, अशा प्रकारे वगळले जात असताना मुस्लिम समाजाने आपल्या धार्मिक प्रतिष्ठा व अस्मिता जपण्यासाठी ठाम भूमिका घ्यावी.
संघटनेचे आवाहन :
- गरबा किंवा अशा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नये जिथे मुस्लिम समाजाला उघडपणे वगळण्यात आले आहे.
- गणेश विसर्जनावेळी मूर्ती किंवा भक्तांवर फुले उधळण्याची जुनी परंपरा मुस्लिम समाजाने थांबवावी. इस्लाम अशा प्रथांना मान्यता देत नाही, याची आठवण संघटनेने करून दिली.
- मुस्लिम तरुणांनी गरब्यात नाचणे, समालोचन करणे, ढोल-डफली वा इलेक्ट्रॉनिक वाद्य वाजविणे हे देखील टाळावे.
- संपूर्ण समाजाने एकत्रित राहून आपला धर्म, अस्मिता आणि प्रतिष्ठा जपावी व कोणत्याही राजकीय किंवा सांप्रदायिक संघटनेच्या प्रभावाखाली जाऊ नये.
संघटनेचा ठाम संदेश असा आहे की—
“जेव्हा आम्हाला स्वीकारले जात नाही, तेव्हा आम्ही अशा कार्यक्रमांना का उपस्थित राहावे?”
एकता संघटनेने मुस्लिम तरुणांना स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की त्यांनी या आवाहनाचे पूर्ण जबाबदारीने पालन करावे. “समाजाची एकता आणि स्वाभिमान जपणे हीच खरी वेळेची गरज आहे,” असे मुफ़्ती खालिद फारुख शेख व जिल्हा एकता संघटनेचे पदाधिकारी यांनी आवाहनात नमूद केले आहे.
