सेवा पंधरवड्यानिमित्त पिंपळे येथे वृक्षारोपण व जलपूजन कार्यक्रम संपन्न..

0
New-Doc-09-22-2025-06.36.jpg

आबिद शेख/अमळनेर

पिंपळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “सेवा पंधरवडा” उत्साहात साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपळे येथे वृक्षारोपण व जलपूजनाचा कार्यक्रम खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते पार पडला.

मार्गदर्शन करताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, “महिला सक्षम असेल तर परिवार सक्षम होतो. राष्ट्रनेता यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा उपक्रमात प्रत्येकाने ‘एक पेड मा के नाम’ लावावे. तसेच स्वदेशी वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करून पर्यावरण संवर्धन आणि जलसंपदा जतनाचे महत्त्व लक्षात घेणे गरजेचे आहे.”

या कार्यक्रमास भैरवी पलांडे, डॉ. अनिल शिंदे, निंबा दला चौधरी, माजी शेतकी संघ अध्यक्ष संजय पुनाजी पाटील, माजी उपसभापती भिकेश पाटील, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, बालविकास अधिकारी हेमलता पाटील, वजाताई भिल, रेखाताई पाटील, जिजाबराव पाटील, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, पिंपळे बुद्रुकचे माजी सरपंच योगेश अशोक पाटील, स्थानिक ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा पाटील व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, धरती माता महिला शेतकरी गट तसेच तिन्ही गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संदीप पाटील यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed