मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरातून ४६ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी संधी..

0
New-Doc-09-21-2025-20.29.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपत श्री मंगळग्रह सेवा संस्था यांच्या पुढाकाराने रविवारी (दि. २१) मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी तसेच आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांचे सहकार्य लाभले.

या शिबिरात अमळनेर, धुळे, चोपडा, जळगाव, एरंडोलसह ग्रामीण भागातून तब्बल ८४ रुग्णांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी ४६ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असून, त्यांना तत्काळ पनवेल येथील आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रवाना करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. रुग्णांची तपासणी नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. राहुल चौधरी व डॉ. गौरव तायडे (शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल) यांनी केली. कॅम्पचे मुख्य संयोजक भूपेंद्र तरवाघ, प्रशांत कोळी आणि अरुण पारधी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

रुग्णांना पनवेल येथे सुरक्षितरीत्या पोहोचवण्यासाठी त्वरित वाहन व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, रजनीकांत पाटील, अजय पाटील, नितेश बारी, प्रमोद पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.


रवि ज्वेलर्स,अमळनेर,सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 114000

22 Ct सोने 91.60% : ₹. 104800

18 Ct सोने 75.00% : ₹. 86600

शुद्ध चांदी 999%:₹. 1350/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed