ब्रह्माकुमारिज तर्फे संध्याछाया वृद्धाश्रमातील बंधू-भगिनींचा सत्कार..

0
New-Doc-09-21-2025-15.34.jpg


24 प्राईम न्यूज 21 Sep 2025

दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी ब्रह्माकुमारिज सुखमणी फरांदे पार्क सेवा केंद्रात आध्यात्मिक राजयोग सेवा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास वसंतनगर सेंटरच्या जेष्ठ राजयोगीनी ब्रह्माकुमारिज स्वाती दिदिजी, फरांदे पार्कच्या बि.के. अनिता दिदी, बि.के. वंदना दिदी व बि.के. योगिनी दिदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बि.के. अनिता दिदी यांनी केले. त्यांनी संध्याछाया वृद्धाश्रमातील बंधू-भगिनींनी नुकताच आध्यात्मिक कोर्स पूर्ण केल्याचे सांगितले.

या प्रसंगी जेष्ठ राजयोगीनी ब्रह्माकुमारिज स्वाती दिदिजींनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “परमपिता परमात्म्याजवळ जाण्याचा खरा मार्ग राजयोगाच्या ज्ञानातून प्राप्त होतो. या राजयोगातून प्रत्येकाला आनंद, खुशी व समाधानाचा अनुभव घेता येतो.”

कार्यक्रमास उपस्थित वृद्धाश्रमातील भाऊ-बहिणींना ईश्वरीय सौगात देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. सौ. कल्पना जाधव यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.

या वेळी फरांदे पार्क व परिसरातील ब्रह्माकुमारिज परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed