फ्री फायर गेमसाठी पैसे न दिल्याने भाच्याने आत्यावर सांडशीने हल्ला; गंभीर जखमी..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : मोबाईलवरील फ्री फायर गेम खेळण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून भाच्याने आत्याच्या डोक्यात सांडशीने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना अमळनेर येथे १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भाच्याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हलीमा बी. अब्दुल रशीद (रा. ख्वाजानगर, रेल्वे टाकी फाईल) या घरी असताना त्यांचा भाचा सकलैन मोहिद्दीन पिंजारी याने गेमसाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने आत्याच्या डोक्यात सांडशीने मारून “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या हलीमा बी. यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळ्याला हलविण्यात आले.
याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 118(1), 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे अधिक तपास करीत आहेत.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 114000
22 Ct सोने 91.60% : ₹. 104800
18 Ct सोने 75.00% : ₹. 86600
शुद्ध चांदी 999%:₹. 1350/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
