अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमाला : रसिकांसाठी पर्वणी..

0
New-Doc-09-20-2025-22.51-1.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर, प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन मा. अनिल भाईदास पाटील, आमदार यांच्या हस्ते होणार असून मा. स्मिता उदय वाघ, खासदार जळगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.

२२ सप्टेंबर : प्रसिद्ध संगीतकार मा. श्री. कौशल इनामदार (मुंबई) – एका संगीतकाराची मुसाफिरी (किस्से, गाणी आणि अनुभव)

२३ सप्टेंबर : सुप्रसिद्ध मराठी कवी मा. श्री. अशोक बागवे व मा. श्री. अरुण म्हात्रे (ठाणे) – काव्यसंध्या (सुमधुर मराठी कवितांचा सुंदर कार्यक्रम)

२४ सप्टेंबर : समाजसेविका मा. ममता सिंधुताई सपकाळ (पुणे) व प्रसिद्ध गझलकार – हा खरा जीवन प्रवास

२५ सप्टेंबर : इंजी. सुधीर वाघुळदे व डॉ. राहुल भोईटे (जळगाव) – आनंदी पालकत्व (सकारात्मक दृष्टिकोन)

२६ सप्टेंबर : सिनेअभिनेता, लेखक व दिग्दर्शक मा. श्री. योगेश सोमण (मुंबई) – कला क्षेत्राचा समाज मनावर होणारा प्रभाव

ही व्याख्यानमाला मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे दररोज सायंकाळी ६.३० वाजता होणार असून, रसिकांसाठी ज्ञान, कला व संस्कृतीची पर्वणी ठरणार आहे.

या व्याख्यानमालेस उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, सोमनाथ ब्रह्मे, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी यांच्यासह कार्यकारिणी व स्वीकृत सदस्यांनी केले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 114000

22 Ct सोने 91.60% : ₹. 104800

18 Ct सोने 75.00% : ₹. 86600

शुद्ध चांदी 999%:₹. 1350/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed