अमळनेरात ‘अपहरणाचा रील’ चित्रीकरण महागात; पोलिसांनी दाखवला खाक्या…

0
New-Doc-09-21-2025-10.25.jpg


आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : शहरातील तीन तरुणांनी मुलांचे अपहरण केल्याचा बनाव करून रील चित्रीत करणे चांगलेच महागात पडले. घाबरलेल्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून तिघांना ताब्यात घेतले. त्यांना खाक्या दाखवून तंबी देत पालकांच्या ताब्यात सोपवण्यात आले.

दिनांक १९ रोजी दुपारी शिवाजी बगीच्याजवळ तीन तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून अपहरणाचा प्रॅंक रील करण्याचा प्रयत्न केला. “दोन को उठाया है, अब तिसरे को उठाना है” असे म्हणत ते एका लहान मुलाकडे धावले. घाबरलेला मुलगा पळून गेला आणि घरी जाऊन पालकांना घटनेची माहिती दिली.

तेव्हाच सैन्यदलातील एका तरुणाने संशय आल्याने तिघांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मोटरसायकलच्या नंबर प्लेटवर पाय ठेवून नंबर झाकला आणि पसार झाले मुलाच्या पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये तोंडावर रुमाल बांधून पळणारे तिघे स्पष्ट दिसले. मोटरसायकल नंबरच्या आधारे त्यांची ओळख पटवून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कबूल केले की, आम्ही केवळ रील बनवत होतो.

घटनास्थळावरून समजले की, यातील दोन मुले गरीब मजुरांची असून एक मुलगा अधिकाऱ्याचा होता. शहरातील समाजसेवकांनी या मुलांच्या वर्तनाची हमी दिली. मात्र त्यांनी पालकांना आवाहन केले की ते कोठे जातात, काय करतात याची माहिती घ्यावी अन्यथा मुले गमतीत खरे गुन्हेगार बनतील किंवा खोट्या गुन्ह्यात अडकतील, असा इशारा समाजसेवकांनी दिला.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 114000

22 Ct सोने 91.60% : ₹. 104800

18 Ct सोने 75.00% : ₹. 86600

शुद्ध चांदी 999%:₹. 1350/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed