लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक – अदिती तटकरे..

0
New-Doc-09-20-2025-07.13.jpg


मुंबई :राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

जुलै २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. सुरुवातीला २ कोटी ६२ लाख महिलांनी अर्ज करून लाभ घेतला होता. मात्र तपासाअंती अनेक अपात्र महिला—सरकारी कर्मचारी, नमो योजनेच्या लाभार्थी तसेच चारचाकी वाहनधारक महिला—योजना घेत असल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांना योजनेतून वगळण्यात आले असून सध्या २ कोटी ४७ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

राज्य सरकारसमोर वाढत्या आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थ्यांना वेळेत निधी पोहोचावा यासाठी ही ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ई-केवायसी प्रक्रिया ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर शुक्रवार, १९ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. सर्व लाभार्थींनी पुढील दोन महिन्यांच्या आत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सवर केले आहे.


रवि ज्वेलर्स,अमळनेर,सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 113200

22 Ct सोने 91.60% : ₹. 104100

18 Ct सोने 75.00% : ₹. 86000

शुद्ध चांदी 999%:₹. 1335/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed