लोण ग्रुप विद्यालयात मा. आमदार साहेबराव दादांच्या मदतीने लागवडलेली झाडे आज हिरवीगार. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा आमदारांना मनःपूर्वक आभार
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर सन २०१७ मध्ये मा. आमदार साहेबराव दादा यांनी माध्यमिक विद्यालय लोण ग्रुप येथे आयोजित कार्यक्रमास भेट दिली होती. त्या प्रसंगी त्यांनी शाळेच्या परिसरात झाडे लावण्यासाठी व त्यांचे संरक्षण करण्यासाठी ट्री गार्ड उभारणीसाठी ५ हजार रुपयांची मदत दिली होती.
आमदारांच्या या मदतीचा उपयोग करून शाळेने परिसरात विविध प्रकारची झाडे लावली. आज ८ वर्षांनंतर ती सर्व झाडे हिरवीगार, दाट वाढलेली असून शाळेच्या परिसराला एक नवे सौंदर्य प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांना झाडांमुळे ताजे, स्वच्छ व निरोगी वातावरण मिळत आहे. शाळेत शैक्षणिक वातावरणाबरोबरच पर्यावरणपूरक परिसराची निर्मिती झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची जाणीव वाढत आहे.
शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर ठाकूर म्हणाले की, “मा. आमदार साहेबराव दादा यांनी शाळेला दिलेल्या मदतीमुळे आज शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांसाठी आदर्श असे हिरवेगार वातावरण तयार झाले आहे. याचा विद्यार्थ्यांना दीर्घकाळ फायदा होईल.”
यासाठी माध्यमिक विद्यालय लोण ग्रुपचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मा. आमदार साहेबराव दादा यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
–
रवि ज्वेलर्स,अमळनेर,सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 113200
22 Ct सोने 91.60% : ₹. 104100
18 Ct सोने 75.00% : ₹. 86000
शुद्ध चांदी 999%:₹. 1335/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
