अमळनेर तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा उत्साहात संपन्न..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : शिक्षण विभाग, पंचायत समिती अमळनेर, तालुका विज्ञान अध्यापक मंडळ व पीबीए इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” या विषयावर आधारित तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा शनिवार, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी रोटरी हॉल, पीबीए इंग्लिश स्कूल अमळनेर येथे उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत तालुक्यातील एकूण १० शाळांनी सहभाग नोंदवला. गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. रमेश माने (मराठी विभाग प्रमुख, प्रताप महाविद्यालय) व प्रा. ज्ञानेश्वर पाटील (नाट्यशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय) यांनी काम पाहिले.
स्पर्धेत प्रथम क्रमांक – काजल योगेश गुरव व समूह (शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे),
द्वितीय क्रमांक – देवेंद्र कमलाकर पाटील व समूह (विजय नाना पाटील आर्मी स्कूल, अमळनेर),
तृतीय क्रमांक – स्वाती प्रताप पाटील व समूह (पं. नेहरू माध्यमिक विद्यालय, फाफोरे) यांनी पटकावला.
उत्तेजनार्थ क्रमांक तपन प्रकाश पाटील व समूह (साने गुरुजी विद्यालय, अमळनेर) व नित्या गणेश पाटील व समूह (पीबीए इंग्लिश स्कूल, अमळनेर) यांना देण्यात आला. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पथक प्रतिनिधित्व करणार आहे.
या कार्यक्रमासाठी पीबीए इंग्लिश स्कूलचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक जिजाबराव देवरे, डी.आर. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा सूर्यवंशी, रोटरी क्लब अमळनेरचे चेअरमन व सर्व रोटरीयन यांचे विशेष सहकार्य लाभले.
स्पर्धेनंतर विद्यार्थ्यांची मनोगते झाली. तसेच इंस्पायर अवॉर्डसाठी निवड झालेल्या टाकरखेड्याची विद्यार्थीनी धनश्री योगेश पाटील हिचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. परीक्षक प्रा. डॉ. रमेश माने यांनी निकाल जाहीर करताना विद्यार्थ्यांना विज्ञानाशी निगडित विविध उदाहरणांद्वारे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन पेंढारे यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदा पाटील यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभाग, विज्ञान अध्यापक मंडळ तसेच सर्व सहकारी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 113200
22 Ct सोने 91.60% : ₹. 104100
18 Ct सोने 75.00% : ₹. 86000
शुद्ध चांदी 999%:₹. 1335/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
