“आय लव्ह मुहम्मद” प्रकरणावरून जळगावमध्ये निषेध – एकता संघटनेची राष्ट्रपती व पंतप्रधानांकडे मागणी..

0
New-Doc-09-18-2025-23.02.jpg

आबिद शेख/ अमळनेर


जळगाव, १८ सप्टेंबर उत्तर प्रदेशातील कानपूर येथे “आय लव्ह मुहम्मद” असे लिहिल्याबद्दल २५ मुस्लिम तरुणांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरचा निषेध जळगाव जिल्ह्यात उमटला आहे. जिल्हा एकता संघटनेने याबाबत राष्ट्रपती व पंतप्रधानांकडे याचिका सादर करून त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांनी सांगितले की, “आय लव्ह मुहम्मद लिहिणे हा कोणत्याही धर्माचा अपमान नसून श्रद्धा व भक्तीची अभिव्यक्ती आहे. त्याला गुन्हा म्हणणे हे संविधान व लोकशाहीवर हल्ला आहे.”

संघटनेने घटनेतील कलमांचा हवाला देत सांगितले की –कलम १९(१)(अ) नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी देते कलम २५ प्रत्येकास धर्म पाळण्याचा व प्रचार करण्याचा अधिकार देते कलम २१ जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याची हमी देते.

एकता संघटनेच्या मागण्या :

१. सर्व तरुणांवरील एफआयआर तात्काळ मागे घ्यावेत.
२. भविष्यात धार्मिक श्रद्धांविरुद्ध असंवैधानिक कारवाई होऊ नये.
३. प्रत्येक नागरिकाला समानता व धार्मिक स्वातंत्र्याची हमी मिळावी.

संघटनेच्या वतीने हाफिज रहीम पटेल व हाफिज कासिम नदवी यांनी आरडीसी श्रीमती निवृत्ती गायकवाड यांना निवेदन सादर केले या प्रसंगी फारुख शेख, नदीम मलिक, मुफ्ती खालिद, अधिवक्ता आविश शेख, अनीस शाह, शारिक मलिक, अक्रम शेख, इम्रान शेख, सय्यद इम्रान अली, अन्वर सिकलगार, शाहिद शेख, शेख रेहान रजा, मुफीस बागबान, शाकीर मलिक, शारीक शेख, मजहर शेख, अरविम शेख, अरविंद शेख, अरविंद पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 113500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 104400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 86200/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1335/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed