अमळनेर नगर परिषदेमार्फत सेवा पंधरवडा – ‘स्वच्छोस्तव’ स्वच्छता हि सेवा अभियानाचा उत्साहात प्रारंभ.

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MoHUA) भारत सरकार यांच्या आदेशानुसार सेवा पंधरवडा अंतर्गत ‘स्वच्छोस्तव – स्वच्छता ही सेवा’ अभियान २०२५ व मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचा उत्साहात शुभारंभ अमळनेर नगर परिषदेमार्फत करण्यात आला.
आज दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते ४ दरम्यान ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे आयोजित आरोग्य शिबिराचा लाभ नगर परिषदेतील NULM बचत गटातील महिला, स्वच्छता विभागातील कर्मचारी व प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी यांनी घेतला.
यानंतर सकाळी ११ वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले. सदर शिबिरात खासदार स्मिताताई वाघ व मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ५ लाभार्थ्यांना प्रतीकात्मक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या, प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत ५ घरांना बांधकाम परवानगी व ३ महिला बचत गटांना दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत १९ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांना प्रधानमंत्री सूर्य घर योजनेची माहिती देण्यात आली.
दुपारी २ वाजता धुळे रोडवरील रवी नगर येथील ओपन स्पेस व साने गुरुजी उड्डाणपुल परिसरात एकूण ७५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम खासदार स्मिताताई वाघ, भैरवीताई पलांडे, मुख्याधिकारी तुषार नेरकर व अनिल शिंदे यांच्या हस्ते पार पडला.
त्यानंतर अमळनेर बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. खासदार स्मिताताई वाघ, भैरवीताई पलांडे, मुख्याधिकारी तुषार नेरकर व डॉ. अनिल शिंदे यांनी स्वतः झाडू हाती घेऊन परिसर स्वच्छतेत सहभाग घेतला.
या अभियानात उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण, अभियंता सुनील पाटील, पाणीपुरवठा अभियंता प्रवीण बैसाणे, स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे व संतोष माणिक यांच्यासह नगर परिषदेतील सर्व विभागप्रमुख, कर्मचारी, मुकादम, सफाई कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला हौसिंग ट्रस्ट पदाधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक गणेश गढरी, युनुस शेख, अनंत संदानशिव, श्याम करंदीकर तसेच मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम अमळनेर नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. स्वच्छता हि सेवा अभियान दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान राबविण्यात येणार असून, या अभियानात शहरातील सर्व नागरिक, शासकीय-निमशासकीय संस्था, शाळा, आस्थापना व सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्याचे आवाहन खासदार स्मिताताई वाघ, प्रशासक तुषार नेरकर व डॉ. अनिल शिंदे यांनी केले आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 113500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 104400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 86200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1335/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
