महेश विजय पाटील यांची शिवसेना उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती…
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : शिवसेना पक्षाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांच्या स्वाक्षरीने महेश विजय पाटील (मु.पो. सारबेटे खु., ता. अमळनेर, जि. जळगांव) यांची शिवसेना उपतालुका प्रमुख (ग्रामीण, अमळनेर तालुका) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती दि. १६ ऑगस्ट २०२५ पासून एक वर्षासाठी देण्यात आली असून, या कालावधीत पक्ष संघटन वृद्धीसाठी सक्रीय कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व विचारांचा प्रसार तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचे पालन करून शिवसेना बळकट करण्याचे आवाहन नव्या पदाधिकाऱ्याला करण्यात आले आहे.
या निवडीबद्दल पक्षाकडून महेश पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले असून, आगामी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 113500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 104400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 86200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1335/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
