छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अमळनेरात उत्साहात संपन्न…
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या दि. २५ मार्च २०२५ च्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत “गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचं बळकटीकरण” या योजनेंतर्गत दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी तहसिल कार्यालय व पंचायत समिती आवार, अमळनेर येथे समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या शिबीराचे उद्घाटन जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसिलदार श्री. रुपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी श्री. नरेंद्र पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर, महिला व बालकल्याण अधिकारी सौ. प्रेमलता पाटील, तालुका कृषी अधिकारी श्री. चंद्रकांत ठाकरे तसेच महसूल व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शिबिरात विविध शासकीय विभागांनी स्वतंत्र स्टॉल लावून नागरिक, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांच्या तक्रारी व समस्या सोडवल्या. वंचित लाभार्थ्यांना खासदार स्मिताताई वाघ व तहसिलदार श्री. सुराणा यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व धनादेशांचे वाटप करण्यात आले.
शिबिरात देण्यात आलेले प्रमुख लाभ :
पुरवठा शाखा तहसिल कार्यालय: ९१ नवीन व दुबार शिधापत्रिका वितरण
संगायो शाखा: २५१ डीबीटी प्रक्रिया पूर्ण, ३ राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना मंजुरी
सेतु शाखा: १०१ उत्पन्नाचे दाखले, ७१ राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रे, ७१ रहिवासी प्रमाणपत्रे, ७८ जातीचे दाखले वितरण, ३१ आधार नोंदणी, १५९ आधार दुरुस्ती
कृषी विभाग: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत २ इलेक्टिक मोटार, ७ प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) घरकुल मंजुरी
नगरपरिषद अमळनेर: ५ गृहप्रवेश सोहळे, ५६ आयुष्मान भारत कार्ड वाटप, ३ बचत गटांना कर्ज वाटप, ६ PPE Kit वाटप, १२ प्रशस्तीपत्रे, २९ घरकुल योजनेसाठी जमीन वाटप, ८ उमेद अभियान कर्ज वाटप
या शिबिरात सुमारे ६०० ते ६५० नागरिकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार श्री. सुराणा यांनी केले. सूत्रसंचालन श्री. संजय पाटील (उपशिक्षक, मंगरुळ) यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. प्रशांत धमके, निवडणूक नायब तहसिलदार यांनी केले.
अमळनेर तालुक्यातील नागरिकांनी समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 113500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 104400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 86200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1335/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
