अंबरशी महाराज टेकडीवर वृक्षारोपण करून मोदींचा वाढदिवस साजरा..

0
New-Doc-09-18-2025-11.01.jpg

आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर : भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अंबरशी महाराज टेकडीवर टेकडी ग्रुपतर्फे विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात ७५ रोपांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

टेकडी ग्रुपचे सर्व सदस्य या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले. वृक्षारोपण करून त्यांनी पंतप्रधान मोदी साहेबांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व मंगलमय जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

सदस्यांनी सांगितले की, “वृक्ष लागवड हेच खरे समाजकार्य असून मोदीजींप्रमाणे आपण सर्वांनी समाजहितासाठी योगदान द्यावे.”
या अनोख्या उपक्रमामुळे टेकडी परिसर हरितमय झाला असून स्थानिक नागरिकांकडून टेकडी ग्रुपच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 113500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 104400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 86200/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1335/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed