मुस्लिम समुदायाकडून मोदींना शुभेच्छा; वक्फ २०२५ कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी..

0
New-Doc-09-18-2025-10.04.jpg


24 प्राईम न्यूज 18 Sep 2025

जळगाव :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा एकता संघटनेतर्फे जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाबाहेर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यात आल्या, मात्र त्याच वेळी वक्फ २०२५ कायदा तात्काळ रद्द करण्याचा ठाम इशाराही देण्यात आला.

संघटनेच्या वतीने वकील सलीम पटेल आणि मुफ्ती खालिद यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन सादर केले. या निवेदनात मुस्लिम समुदायाला संसद व विधानसभेत योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी करण्यात आली.

“सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास हे फक्त भाषणांत न राहता राजकीय पदांवर व जबाबदाऱ्यांमध्ये दिसून आले पाहिजे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले.

संघटनेने १५ सप्टेंबर २०२५ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत सांगितले की वक्फ मालमत्ता ही मुस्लिम समुदायाचा धार्मिक व सामाजिक वारसा असून, तिचे संरक्षण करणे ही सरकारची संवैधानिक जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने वक्फ २०२५ कायदा रद्द न केल्यास तो मुस्लिम समुदायाच्या हक्कांवरील अन्याय ठरेल, असेही स्पष्ट करण्यात आले.

एकता संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांनी चेतावणी दिली की, जर सरकारने मागण्यांचा गांभीर्याने विचार केला नाही तर मुस्लिम समुदाय आक्रमक लोकशाही आंदोलन छेडेल.

मुफ्ती खालिद, फारुख शेख, सय्यद चाँद, अधिवक्ता सलीम पटेल, हाफिज रहीम पटेल, हाफिज कासिम नदवी, मौलाना गुफ्रान, अनीस शाह, मतीन पटेल, रज्जाक पटेल, कासिम उमर, अधिवक्ता आविश शेख, नजमुद्दीन शेख, अकील मणियार, हाजी जाकीर कुरेशी आदी उपस्थित होते.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 113500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 104400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 86200/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1335/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed