राष्ट्रीय लोकअदालतीत २६२ थकबाकीदारांकडून ३.६७ लाखांची वसुली..

0
New-Doc-09-18-2025-07.19.jpg


आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : राष्ट्रीय लोकन्यायालयात महसूल विभागाच्या एकूण ८१० थकबाकीदारांपैकी २६२ थकबाकीदारांकडून तब्बल ३ लाख ६७ हजार ६९१ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. मात्र गौण खनिज थकबाकीदार लोकन्यायालयात गैरहजर राहिल्याने त्यांच्याकडून एकही रक्कम वसूल झाली नाही.
अमळनेर महसूल विभागाकडे गौण खनिज संदर्भात २८ जणांकडे थकबाकी होती. अंतर्गत लेखा परीक्षणाबाबत १८६ जणांकडे व जमीन महसूल संदर्भात नियत वसुलीची ५९६ थकबाकीदारांची नावे होती.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व निवासी नायब तहसीलदार सी. यू. पाटील यांनी या थकबाकीदारांना नोटिसा बजावून १३ सप्टेंबर रोजी दिवाणी न्यायालयात लोकन्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
लोकअदालतीत झालेल्या वसुलीचे विवरण असे –
अंतर्गत लेखा परीक्षण : ६४ थकबाकीदारांकडून ६१,११६ रुपये
जमीन महसूल नियत वसुली : १९८ थकबाकीदारांकडून ३,०६,५७५ रुपये
गौण खनिज वसुली : शून्य
यामुळे एकूण २६२ थकबाकीदारांकडून ३ लाख ६७ हजार ६९१ रुपयांची वसुली करण्यात महसूल विभागाला यश आले आहे.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 113500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 104400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 86200/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1335/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed