अमळनेर सेवा पंधरवड्याची विविध कार्यक्रमांसह उत्साहात सुरुवात..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंचायत समिती अमळनेर व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम १८ सप्टेंबरपासून सुरू होणार असून विविध विकासात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ सकाळी ९ वाजता खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात येणार असून आमदार अनिल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये –सकाळी ९.०० ते ९.३० पिंपळे खु येथे वृक्ष लागवड व जलपूजन सकाळी ९.४५ ते १०.०० अंचलवाडी येथे पाणीपुरवठा योजना हस्तांतरण. सकाळी १०.१५ ते १०.२५ जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबीर उद्घाटन. सकाळी १०.३५ ते ११.०० अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबीर
सकाळी ११.०० ते दुपारी १.०० पंचायत समिती येथे पोषण माह सप्ताह उद्घाटन, घरकुल जागा वाटप, घरकुल सन्मानचिन्ह व चावी वाटप, आयुष्मान कार्ड वितरण याशिवाय पंचायत समिती आवारात बचतगटांच्या माध्यमातून पंचामृत गोवरी, अगरबत्ती, मूर्ती, मुखवास, बांबू टोपल्या, झाडू, खाऊ यांचे स्टॉल उभारले जाणार आहेत.
महसूल विभागातर्फे महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करून नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटपही करण्यात येणार आहे या सर्व उपक्रमांची माहिती प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांनी दिली.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 113500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 104400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 86200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1335/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
