ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे नगरपरिषद, एसबीआय व वीज महामंडळाला भेट…
आबिद शेख/अमळनेर


अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे नगरपरिषद, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि वीज महामंडळ या तिन्ही शासकीय कार्यालयांना प्रकल्प भेट देण्यात आली. या भेटीत नागरिकांच्या मूलभूत समस्यांबाबत थेट अधिकाऱ्यांशी चर्चा होऊन सकारात्मक आश्वासने मिळाली.
प्रथम नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर यांचा संविधानाची फोटोफ्रेम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी शहरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांवरील करभार कमी करण्यासंबंधी प्रश्न मांडण्यात आले. श्री. नेरकर यांनी या सर्व समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या नव्या व्यवस्थापक श्रीमती सोनाली घोडेस्वार यांची भेट घेऊन त्यांना स्वागतपुष्प देण्यात आले. ग्राहकांच्या बँकिंग अडचणींबाबत चर्चा होऊन श्रीमती घोडेस्वार यांनी त्या सोडविण्यासाठी पूर्णपणे कटीबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
तिसऱ्या सत्रात वीज महामंडळ उपकार्यकारी अभियंता श्री. नेमाडे यांची भेट घेण्यात आली. वीज मीटर बदलल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर वेळेवर नोंद करत नसल्याने नागरिकांना अवाजवी बिल भरण्याची वेळ येते, यावर ग्राहक पंचायत प्रतिनिधींनी लक्ष वेधले. या समस्येचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन श्री. नेमाडे यांनी दिले.
या कार्यक्रमाला प्रांत कार्यकारिणी सदस्या ॲड. सौ. भारती अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष श्री. एस. डी. देशमुख, जिल्हा सहसचिव श्री. मकसूदभाई बोहरी, कोषाध्यक्ष सौ. कपिलाताई मुठे, तालुका अध्यक्षा सौ. स्मिताताई चंद्रात्रे, जिल्हा बँक व सायबर क्राईम प्रमुख श्री. विजय शुक्ल, जिल्हा ऊर्जा प्रमुख श्री. सुनील वाघ, खजिनदार सौ. वनश्री अमृतकार, सौ. अलका गोसावी, श्री. दिगंबर गोसावी, माजी नगरसेवक श्री. पंकज चौधरी, श्री. बाळासाहेब संदानशिव आदी मान्यवर उपस्थित होते.
पंचायतीच्या पी.आर.ओ. सौ. मेहराज बोहरी यांनी ही माहिती दिली.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 113500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 104400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 86200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1335/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
