निवडणुका पुढील वर्षीच! ३१ जानेवारीपर्यंत मनपा निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश..
24 प्राईम न्यूज 17 Sep 2025

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर तारीख मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ३१ जानेवारी २०२६ पूर्वी सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न व इतर कारणांमुळे या निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या जात होत्या. सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी दिलेल्या आदेशानंतरही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने न्यायालयाने मंगळवारी सुनावणीत राज्य सरकार तसेच राज्य निवडणूक आयोगावर तीव्र नाराजी व्यक्त केली राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ६५ हजार ईव्हीएम मशिन्स उपलब्ध आहेत. मात्र, निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी आणखी ५५ हजार मशिन्सची गरज आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने आयोगाला सूचित केले की, ईव्हीएम तसेच इतर संसाधनांच्या मागणीसाठी त्वरित राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा आणि याबाबत मुख्य सचिवांना लेखी पत्रव्यवहार करावा.
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोव्हेंबर २०२५ पर्यंत आवश्यक ईव्हीएम मशिन्स उपलब्ध करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय निवडणूक कर्मचाऱ्यांची उपलब्धता, टप्प्याटप्प्याने होणारी तयारी याबाबत स्पष्ट वेळापत्रक तयार करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
मागील सुनावणीत निवडणुका चार महिन्यांत घेऊ असे आश्वासन देऊनही आयोगाने वेळेत काम पूर्ण केले नाही, हे हलगर्जीपणाचे उदाहरण असल्याची कठोर शब्दांत टीका सर्वोच्च न्यायालयाने केली. आता कोणत्याही परिस्थितीत जानेवारी २०२६ पूर्वी निवडणुका घेण्यास पर्याय नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने सुनावणी समाप्त केली.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 114500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 105300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 87000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1350/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
