अमळनेरमध्ये मेगा ब्लड डोनेशन ड्राईव्ह : रक्तदान अमृत महोत्सव 2.0

0
New-Doc-09-17-2025-07.04.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर | समाजहिताचे कार्य म्हणून मेगा ब्लड डोनेशन ड्राईव्ह अंतर्गत “रक्तदान अमृत महोत्सव 2.0” चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम येत्या १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता रोटरी हॉल, डी. आर. कन्या शाळा समोर, अमळनेर येथे पार पडणार आहे.

प्रत्येक रक्तदात्यासाठी आकर्षक भेटवस्तूंची व्यवस्था करण्यात आली असून, आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

या उपक्रमात श्री ओसवाल जैन संघ, जैन सोशल ग्रुप, रोटरी क्लब, लायन्स क्लब, भारतीय जैन संघटना, न्यू प्लॉट विकास मंच, तेरापंथ युवक परिषद, अमळनेर नगरपरिषद, जळगाव जनता सहकारी बँक तसेच अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना या विविध संस्था सहभागी होत आहेत.

रक्तदानासाठी श्री. घेवरचंद कोठारी, श्री. सुभाषचंद ओसवाल, श्री. सौरभ जैन, श्री. प्रितेश जैन, श्री. देवेंद्र कोठारी, श्री. आशिष चौधरी, डॉ. संदीप जोशी, श्री. महेंद्र पाटील, श्री. रोहित सिंघवी, श्री. प्रतीक जैन, श्री. चेतन राजपूत, श्री. विपीन पाटील, श्री. तुषार नेरकर, श्री. मंगेश गर्गे आदी मान्यवर पुढाकार घेत आहेत.

विशेष आवाहन
“आपल्या एका थेंब रक्तामुळे कुणाला नवजीवन मिळू शकते. चला, रक्तदान हेच श्रेष्ठ दान या संकल्पनेला बळ देऊया!” असा संदेश आयोजकांनी दिला आहे.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 114500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 105300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 87000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1350/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed