पिंपळे खु येथे वृक्षदिंडीद्वारे विद्यार्थ्यांचे पर्यावरण रक्षणाचे आवाहन.
आबिद शेख/अमळनेर

पर्यावरण रक्षण हेच खरे देशाचे संरक्षण या घोषणांनी पिंपळे खु गाव दुमदुमले. ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाच्या उपक्रमात गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली.
या वृक्षदिंडीत कै. सुकलाल आनंद पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डोक्यावर वृक्ष घेऊन सहभाग घेतला. शिक्षक व विद्यार्थिनींच्या उपस्थितीत गावातून दिंडी काढून तिन्ही गावांमध्ये वृक्षांची पालखी काढून आरती करण्यात आली. त्यानंतर शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमात पिंपळे बु. येथील माजी सरपंच योगेश अशोक पाटील, पिंपळे खु. च्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी के.के. लंकेश, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, मुख्याध्यापक सी.एन. पाटील, शिक्षक डी.बी. पाटील, जी.जे. पाटील, हर्षल पवार, निकम सर, श्रीमती गुमानर मॅडम, श्रीमती बाविस्कर मॅडम, अंगणवाडी सेविका, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले.
“पर्यावरणाकडे देऊया ध्यान, मगच बनेल आपला देश महान” या घोषणांसह विद्यार्थ्यांनी दिलेले संदेश गावकऱ्यांच्या मनात उत्साह निर्माण करणारे ठरले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 114500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 105300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 87000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1350/-
🎂
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
