युवकांच्या धाडसामुळे वासराला मिळाले नवे प्राण..

0
New-Doc-09-17-2025-06.46.jpg


आबिद शेख/अमळनेर

शिरुड नाका परिसरातील शिव कॉलनीजवळ आज सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत एका सांडाने गाईच्या वासराला उचलून थेट नाल्यात फेकले. सकाळी अंदाजे साडेसहा वाजता घडलेल्या या घटनेनंतर वासराचे प्राण धोक्यात आले होते. नाल्यात डोके खाली आणि पाय वर अशी अवस्था झाल्याने वासराची स्थिती गंभीर होती.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कुडापा मित्र मंडळातील काही जागरूक युवक तातडीने घटनास्थळी धावले. कोणतीही भीती न बाळगता जवळपास अर्धा तास प्रयत्न करून त्यांनी वासराला नाल्यातून बाहेर काढले.

वासराच्या तोंडातून फेस येत होता, श्वासोच्छवास अडखळत होता. पण भूपेश देशमुख, आबा पाटील, बाला महाजन, संजय पारधी, उमेश वाल्हे, राहुल महाजन आणि दादू वाल्हे या युवकांच्या धाडस व माणुसकीच्या कार्यामुळे अखेर वासराचा जीव वाचवण्यात यश आले.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी या तरुणांचे मनापासून कौतुक केले. वेळेवर मदत मिळाली तर कुणाचाही जीव वाचवता येऊ शकतो, हा संदेश या प्रसंगातून स्पष्टपणे उमटला.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 114500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 105300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 87000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1350/-
🎂
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed