अमळनेरमध्ये वाहतूक पोलिसांचा धडाका : ३३ वाहनांवर कारवाई, २३,५०० रुपये दंड वसूल..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शहरात नो पार्किंगमध्ये वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहिमेत एकूण ३३ वाहनांवर कारवाई करून तब्बल २३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
धुळे रस्त्यावर आयडीएफसी बँकेसमोर, बहुगुणे हॉस्पिटल परिसरात, बसस्थानकाबाहेर तसेच पाचपावली मंदिराजवळ अवैध पार्किंगमुळे कायम वाहतुकीची कोंडी होत असल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिस विलास बागुल, संजय बोरसे, रवींद्र बोरसे आणि विनय पाटील यांनी ही कारवाई केली.
या दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, जादा प्रवासी भरून नेणारी वाहने तसेच सीट बेल्ट न लावणाऱ्या वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरातील धुळे रस्त्यावर बसस्थानकापासून आर.के. नगर तसेच दगडी दरवाज्यापर्यंत ठिकठिकाणी अवैध पार्किंगमुळे रस्ता गिळला गेला असून, याकडे पालिका आणि वाहतूक पोलिसांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची नाराजी आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी अशी नियमित कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी होत आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 114500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 105300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 87000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1350/-
🎂
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
