गौरवभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर..

0
New-Doc-09-16-2025-09.48.jpg


आबिद शेख/अमळनेर

अमळनेर प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गौरवभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार, दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी श्रीराम मंदिर, श्रीराम कॉलनी, अमळनेर येथे सायं. 4 ते 7 वाजेपर्यंत होणार आहे.
या शिबिराचे आयोजन डॉ. नरेंद्र उत्तम महाजन (MBBS, DOMS. मुंबई) व डॉ. रिता नरेंद्र महाजन (BHMS, B. Opt) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
प्रख्यात नेत्र तज्ज्ञांकडून मोफत नेत्र तपासणी व औषधी वितरण
चष्मा तपासणी व मार्गदर्शन
डोळ्यांच्या आजारांवर सखोल मार्गदर्शन
गरजू रुग्णांना नाशिक येथे मोफत शस्त्रक्रियेची सुविधा
सामाजिक कार्यकर्त्या सौ. पूनम गौरव महाजन यांनी आवाहन केले आहे की, नागरिकांनी आपल्या कुटुंबासह या शिबिराचा लाभ घ्यावा. आपल्या उपस्थितीमुळेच या उपक्रमाला खरे यश मिळणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 113200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 104200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 86000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1330/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed