रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त पालक बैठक – विद्यार्थ्यांचा गौरव..
24 प्राईम न्यूज 16 Sep 2025

चाळीसगाव :HUH मुँडिया पब्लिक स्कूल, नागद रोड येथे पालक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने ट्रॅफिक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ट्रॅफिक हवालदार श्री. आबा वाघ व हवालदार श्री. शिरसाठ यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व समजावून सांगितले.
या वेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यात अक्रम बेग हवालदार, आजाद खान सर, बस ड्रायव्हर मुन्ना भाई यांचा समावेश होता.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री. गुलाम दस्तगीर खान, समन्वयक शबीर सर, प्राचार्य तसेच शिक्षकवर्गही कार्यक्रमास उपस्थित होते.
याच बैठकीत शाळेच्या फर्स्ट युनिट टेस्टमधील प्रत्येक वर्गातील टॉपर विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
