राज्य सरकार कर्जाच्या विळख्यात! ३ महिन्यांत २४ हजार कोटींचे कर्ज वाढले, एकूण कर्जाचा आकडा ८.५५ लाख कोटींवर
24 प्राईम न्यूज 16 Sep 2025

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या लोकानुनयाच्या योजना, सरकारी खर्चातील उधळपट्टी आणि वित्तीय शिस्तीचा अभाव यामुळे महाराष्ट्र सरकार कर्जाच्या विळख्यात सापडले आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत (एप्रिल-जून) राज्यावर आणखी २४ हजार कोटी रुपयांचे कर्ज वाढले आहे. जून २०२५ अखेरीस राज्य सरकारवरील एकूण कर्जाचा आकडा तब्बल ८ लाख ५५ हजार ३९७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
आर्थिक वर्षनिहाय राज्य सरकारवरील कर्जाचा तपशील असा – २०२२-२३ : ६ लाख २९ हजार २३५ कोटी २०२३-२४ : ७ लाख १८ हजार ५०७ कोटी २०२४-२५ : ८ लाख ३९ हजार २७५ कोटी २०२५-२६ अखेरीस : ९ लाख ३२ हजार २४२ कोटींवर जाण्याचा अंदाज
राज्य आर्थिक संकटात – जयंत पाटील
“सरकारवर वाढता कर्जाचा बोजा गंभीर आहे, पण सरकार ते मान्य करत नाही. खर्च कमी करण्याऐवजी योजनांची उधळपट्टी सुरू आहे. जीएसटी कररचनेत केलेल्या कपातीचा नेमका परिणाम सरकारने स्पष्ट केला पाहिजे,” असे मत माजी वित्त आणि नियोजनमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
१.४६ लाख कोटींच्या कर्जाला केंद्राची परवानगी
केंद्र सरकारने राज्य सरकारला २०२५-२६ या आर्थिक वर्षात एकूण १ लाख ४६ हजार ६८७ कोटींचे कर्ज उभारण्यास परवानगी दिली आहे. यापैकी पहिल्या नऊ महिन्यांत ९९ हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारले जाणार असून, त्यात १० हजार कोटी रुपयांचे कर्ज नाबार्ड आणि नॅशनल हौसिंग बँकेकडून घेण्यात येणार आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 113200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 104200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 86000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1330/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
