गैर आदिवासी जातींना अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समाविष्ट करू नये – ठाम मागणी…

0
New-Doc-09-15-2025-22.45.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर :गैर आदिवासी समाजातील इतर जाती विविध कागदपत्रांचा आधार घेऊन अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समाविष्ट व्हावे या हेतूने शासनावर दबाव आणत आहेत. यावर आदिवासी समाजाने तीव्र आक्षेप घेतला असून शासनाने कोणतीही बेकायदेशीर कारवाई करू नये, अशी मागणी उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्याकडे करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, अनुसूचित जमाती प्रवर्ग हा भारताच्या संविधानाने निश्चित केलेला आहे व त्यात बदल करण्याचा अधिकार केवळ संसदेलाच आहे. न्यायालय किंवा राज्य सरकारला असा अधिकार नाही. ST आरक्षण हे आदिवासी समाजाच्या भौगोलिक एकाकीपणा, आदिम संस्कृती, चालीरीती, लाजरा बुजरा स्वभाव आणि अति मागासलेपणा या निकषांवर आधारित असल्याने त्यात बाहेरील जातिंचा समावेश करणे घटनाबाह्य ठरेल.

आदिवासी समाजाने शासनाला इशारा दिला आहे की, दबावाखाली किंवा राजकीय कारणास्तव अशा प्रकारचा निर्णय घेतल्यास कायदेशीर मार्गाने व लोकशाही पद्धतीने तीव्र लढा उभारला जाईल. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना एकत्र करून मुंबई येथे व्यापक आंदोलन छेडले जाईल. त्यातून उद्भवणाऱ्या संघर्षाची जबाबदारी शासनाची राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.

ठाम मागण्या :

  1. गैर आदिवासी जातींना अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत कोणतीही कारवाई अथवा प्रस्ताव तात्काळ नाकारावा.
  2. संविधानिक तरतुदीनुसार ST प्रवर्ग केवळ आदिवासी समाजापुरताच मर्यादित राहील, याची शासनाने सार्वजनिक घोषणा करावी.
  3. आदिवासी समाजाच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी शासनाने ठोस व स्पष्ट भूमिका घ्यावी.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 113200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 104200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 86000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1330/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed