अमळनेर तालुक्यात राष्ट्रीय चर्मकार महासंघाची जम्बो कार्यकारिणी गठीत समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढण्याचा निर्धार..

0
New-Doc-09-14-2025-22.31.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर :राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या अध्यक्षतेखाली अमळनेर तालुका व शहर कार्यकारिणीची जम्बो कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
अमळनेर शहर तालुकाध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक नरेश कांबळे, तर तालुकाध्यक्ष म्हणून अरुण मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
शनिवारी माळी मढीजवळील बहुउद्देशीय सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर, राज्य कार्यकारिणी सदस्य धनराज पवार, जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे, युवक जिल्हाध्यक्ष दिपक अनुष्ठान, जिल्हा सचिव लक्ष्मण महाले, जिल्हा संघटक धनराज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी भानुदास विसावे, पांडुरंग बाविस्कर, धनराज पवार, दिपक अनुष्ठान, ईश्वरलाल अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. समाजाच्या न्याय हक्कांसाठी कोणताही भेदभाव न करता एकजुटीने लढण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन कार्यकारिणी
अमळनेर शहर कार्यकारिणी : अध्यक्ष नरेश कांबळे, उपाध्यक्ष गणेश जाधव, सचिव सुनील मोरे.
तालुका कार्यकारिणी : अध्यक्ष अरुण मोरे, उपाध्यक्ष प्रवीण वाघ, निवृत्ती बागुल, सचिव सागर मोरे.
युवा कार्यकारिणी : अध्यक्ष रविंद्र ठाकरे, उपाध्यक्ष विनोद जाधव, सचिव रवींद्र साळुंखे.
अधिकारी कर्मचारी विभाग : अध्यक्ष संजय मोरे, उपाध्यक्ष विलास बिऱ्हाडे, डॉ. माणिक बागले, सचिव वसंत मोरे.
महिला विभाग : अध्यक्ष उषा देवरे, उपाध्यक्ष भारती कार्लेकर, सुरेखा मोरे, सचिव प्रियंका अहिरराव.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बिऱ्हाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दंगल सोनवणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed