३ दशकांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी आश्वासन – आमरण उपोषण मागे..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर हातेड खुर्द, बुधगाव, अनवर्दे खु. शिवारातील शेतकऱ्यांना अप्पर तापी प्रकल्प हतनूर अंतर्गत संपादित जमिनीचा मोबदला अद्याप न मिळाल्याने ७४ वर्षीय शेतकरी उमराव भाऊराव बोरसे यांनी १० सप्टेंबरपासून निम्न तापी प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला.
या प्रश्नावर कोणतीही ठोस हालचाल होत नसल्याने चोपडा तालुक्यातील अनवर्दे व परिसरातील गावांमधून शेतकऱ्यांची मोठी गर्दी आंदोलन स्थळी जमली होती. यावेळी कार्यकारी अभियंता य. म. कडलग यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, माजी जि.प. सदस्य व राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांनी मंत्र्यांशी संपर्क साधला.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या कार्यालयाकडून उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ दालनात बोलावून बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाले. या पार्श्वभूमीवर उपोषणकर्ते उमराव बोरसे यांनी मान्यवरांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले.
या आंदोलनाला उर्वेश साळुंखे, गुलाबराव बोरसे, मनीषा बोरसे, रेखाबाई बोरसे, कविता बोरसे, जगतराव बोरसे, श्रीराम बोरसे, सुनील बोरसे, महेश बोरसे, रवींद्र बोरसे, धनंजय साळुंखे, नाना तिरमले, शुभम तिरमले, महेश पवार, शशिकांत बोरसे, अरुण बोरसे, शरद नन्नवरे, पांडुरंग बोरसे यांच्यासह अन्यायग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 113200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 104200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 86000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1330/-
🎂
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
