निंभोरे गावात सौ. कुमुदिनी पाटील यांची सरपंचपदी निवड..
आबिद शेख/अमळनेर

निंभोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्या श्री. एस. यु. पाटील यांच्या सुन आहेत. निवडीनंतर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत त्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला मार्केटचे संचालक समाधानभाऊ धनगर, “माझे सरपंच” उपक्रमाचे सुनील सर, माजी सरपंच पायल पाटील, माजी सरपंच चंद्रकला पाटील, उपसरपंच आलेश धनगर, गावातील ज्येष्ठ नागरिक नारायण आप्पा, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी दिनेश अण्णासाहेब, प्रा. नितीन पाटील, शरद पाटील, अनिल धनगर, शामराव पाटील, निलेश पाटील, परमेश्वर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांनी हसतमुखाने व आनंदाने नव्या सरपंचांचे स्वागत करून भविष्यातील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
