जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा : पोदार, ओरियन व रायसोनी विजयी.                                        उत्कृष्ट खेळाडू – हितेश, अस्मा व हरिप्रिया..

0
New-Doc-09-14-2025-22.05.jpg

आबिद शेख/अमळनेर


जळगाव :मागील पाच दिवसांपासून गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर सुरू असलेल्या आंतरशालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धांना रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. अंतिम सामन्यांमध्ये पोदार, ओरियन व रायसोनी संघांनी विजेतेपद पटकावले.

मनपा १४ वर्षाखालील गटातील अंतिम सामन्यात पोदारने ओरियनचा १–० असा पराभव करून विजेतेपद मिळवले. तर जिल्हास्तरीय १७ वर्ष मुलींच्या मनपा गटात रायसोनीने पोदारवर १ गोलने विजय मिळवत धक्कादायक यश संपादन केले. उर्वरित १७ वर्ष मुलींच्या गटात रुस्तमजीने काकासाहेब पूर्णपात्रे चाळीसगाववर १–० अशी मात करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

पारितोषिक वितरण

विजयी व उपविजयी संघातील खेळाडूंना जिल्हा फुटबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स हाऊसतर्फे पदक व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
प्रा. डॉ. अस्मिता पाटील, फारुक शेख, ताहेर शेख, हिमाली बोरोले, कल्याणी आटोळे (पोदाऱ्यावल), रोहिणी सोनवणे (सेंट जोसेफ) यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.
यावेळी ममता प्रजापत, वसीम रियाज, वसीम चांद, तौसीफ शेख, साबीर शेख, उदय फालक, पंकज तिवारी, हेमंत गोरे (४० गाव) व सौ. के. पी. पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू

१) पोदारचा हितेश पाटील
२) रायसोनीची अस्मा पांडे
३) काकासाहेब पूर्णपात्रे चाळीसगावची हरिप्रिया महाजन


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed