आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा : शानबागचा ऐतिहासिक विजय, लॉर्ड गणेशा उपविजयी..

0
New-Doc-09-14-2025-06.56.jpg


शानबागचा भावेश पाटील ठरला उत्कृष्ट खेळाडू

24 प्राईम न्यूज 14 Sep 2025
जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत शनिवारी १४ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात शानबाग स्कूल, जळगावने लॉर्ड गणेशा स्कूल, जामनेरवर १–० असा रोमांचक विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

सामना शेवटच्या टप्प्यात चुरशीचा झाला. खेळ संपण्याच्या अवघ्या तीन मिनिटे आधी शानबागच्या खेळाडूंनी निर्णायक गोल करत लॉर्ड गणेशाचा विजयाचा मार्ग बंद केला. त्यामुळे मैदानावर जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान शानबागचा भावेश पाटील याच्या नावे राहिला.
दरम्यान, मनपा स्तरावरील अंतिम सामना रविवारी पोदार स्कूल व ओरियन सीबीएसई स्कूल यांच्यात रंगणार असून त्याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

पारितोषिक वितरण

विजयी व उपविजेते संघाच्या खेळाडूंना पदके व गौरवचिन्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष (अल्पसंख्यांक) मजहर पठाण, हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा डॉ. अनिता कोल्हे व जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed