वासरे-कळमसरे पूरग्रस्तांना शेल्टर कम हायजीन किटचे वाटप.                                                  कार्ड जालना व साने गुरुजी फाउंडेशन अमळनेरचा उपक्रम

0
New-Doc-09-14-2025-06.45.jpg


आबिद शेख (अमळनेर

अमळनेर (दि. १३) :मागील आठवड्यातील अतिवृष्टी व अचानक आलेल्या पूरपरिस्थितीमुळे अमळनेर तालुक्यातील वासरे व कळमसरे गावात मोठे नुकसान झाले. शेतजमीन, घरांची पडझड, घरातील धान्य, भांडीकुंडी व इतर साहित्य वाहून गेल्याने अनेक कुटुंबांना शाळेमध्ये आश्रय घ्यावा लागला होता.

या पार्श्वभूमीवर सेंटर फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (कार्ड), जालना व साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त कुटुंबांना शेल्टर कम हायजीन किट्स वाटप करण्यात आले.

या किटमध्ये ताडपत्री (लहान व मोठी), मच्छरदाणी, अंग धुण्याचे साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, दोरी, बॅग आदी दहा प्रकारच्या वस्तूंचा समावेश होता.

यावेळी साने गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कळमसरेचे उपसरपंच जितेंद्र राजपूत, तलाठी भूषण पाटील, मुकेश देसले, वासरे येथील रोहिदास पाटील, दिनेश पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या उपक्रमासाठी कार्यकर्ते शरद पाटील, संदीप धाकड, सचिन मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 113000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85900/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1320/-
🎂
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed