३ दशकांपासून मोबदला नाही; हतनूर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे आमरण उपोषण चौथ्या दिवशी

0
New-Doc-09-14-2025-06.30.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर अप्पर तापी प्रकल्प हतनूर करिता संपादित जमिनींचा मोबदला तीन दशकांपासून मिळालेला नाही, या मागणीसाठी चोपडा तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथील ७४ वर्षीय शेतकरी उमराव भाऊराव बोरसे १० सप्टेंबरपासून आमरण उपोषणास बसले असून शनिवारी उपोषणाचा चौथा दिवस उलटला आहे. मात्र प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून, शेतकरी व जनआंदोलन समिती सोमवारपासून तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहेत.

अनवर्दे ता.चोपडा येथील ७७ शेतकऱ्यांच्या जमिनी अप्पर तापी प्रकल्पासाठी संपादित झाल्या आहेत. प्रकल्पाचे पाणी लाभार्थी शेतकऱ्यांना मिळत असले तरी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित झाली, त्यांना आजपर्यंत योग्य व पारदर्शक मोबदला मिळालेला नाही. गेल्या ३० वर्षांपासून न्याय मिळावा म्हणून पाठपुरावा सुरू आहे.

उपोषणकर्ते बोरसे यांचे आरोग्य ढासळण्याची चिन्हे दिसत असूनही जिल्हा भूसंपादन अधिकारी व कार्यकारी अभियंता यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. आंदोलनकर्त्यांच्यावतीने रोज लेखी निवेदन प्रशासनाला देण्यात येत आहे.

आंदोलनाच्या चौथ्या दिवशी उपोषण स्थळी अनवर्दे सरपंच सचिन शिरसाट, उपसरपंच महेश पवार, पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, निंभोरा सरपंच सुनिल पाटील आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.

सोमवारपासून शेतकरी अधिक आक्रमक आंदोलन करणार असल्याचे संकेत मिळत असून, या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक झाले आहे.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 113000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85900/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1320/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed