खरीप हंगाम २०२५ : ई-पीक पाहणीस सहा दिवसांची मुदतवाढ..
24 प्राईम न्यूज 13 Sep 2025

खरीप हंगाम २०२५ साठी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस सहा दिवसांची अतिरिक्त मुदत मिळाली आहे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार आता शेतकरी २० सप्टेंबर २०२५ पर्यंत मोबाईल अॅपद्वारे ई-पीक नोंदणी करू शकतील.
यापूर्वी ही मुदत १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२५ इतकी निश्चित करण्यात आली होती. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी झालेली अतिवृष्टी, दुबार पेरणी यांसारख्या कारणांमुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले. शेतकऱ्यांचा या प्रक्रियेत सहभाग वाढावा, यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.
ई-पीक नोंदणीची मुदत संपल्यानंतर २१ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत उर्वरित शेतकऱ्यांची पाहणी सहायक स्तरावरून पूर्ण केली जाणार आहे.
या निर्णयाची माहिती सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच संबंधित अधिकारी-कर्मचारी व शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी तथा राज्य संचालक (महसूल माहिती तंत्रज्ञान कक्ष), जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहेत.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 113000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1320/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
